आयर्लंडच्या मार्गात आज कॅनडाचा अडथळा

सलामीच्या लढतीत बलाढय़ हिंदुस्थानकडून झालेल्या दारुण पराभवानंतर आयर्लंडचा संघ शुक्रवारी कॅनडाविरुद्ध भिडणार आहे. दुसरीकडे आयर्लंडलाही सलामीच्या लढतीत यजमान अमेरिकेने हरविलेले आहे, मात्र या टी-20 क्रिकेटमधील एक धोकादायक संघ होय. त्यामुळे हिंदुस्थाननंतर आता आयर्लंडच्या मार्गात कॅनडाचा अडथळा असेल.

आठव्यांदा वर्ल्ड कपच्या व्यासपीठावर खेळत असलेला आयर्लंडचा संघ यावेळी पूर्वीसारखा धोकादायक वाटत नाहीये. या संघातील अनेक प्रमुख खेळाडू काऊंटी क्रिकेटमध्ये खेळत असतात. त्यामुळे उद्याच्या लढतीत अॅण्डी बालबर्नी, पॉल स्टर्लिंग व हॅरी टेक्टर या अनुभवी खेळाडूंना पॅनडाविरुद्ध आपल्या लौकिकास साजेसा खेळ करावा लागणार आहे. या संघाने 2009च्या वर्ल्ड कपमध्ये सुपर-8 फेरी गाठण्याचा पराक्रम केलेला आहे. बालबर्नी आणि कर्णधार स्टर्लिंग या दोघांचा मिळून अडीचशे टी-20 सामने खेळण्याचा अनुभव आहे, मात्र टीम इंडियापुढे हा संघ अगदीच नवख्या संघाप्रमाणे वाटला. मात्र टीम इंडियाविरुद्धच्या पराभवाचा सगळा राग ते कॅनडाविरुद्ध काढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कॅनडाकडे कर्णधार नवनीत धालीवालच्या रूपाने आघाडीच्या फळीतील अनुभवी फलंदाज आहे. तो 2019 च्या संघातही होता. यजमान अमेरिकेविरुद्धही कॅनडाने 194 धावांचा डोंगर उभारला होता. धालीवालसह निकोलस किर्टोन व श्रेयस मोवा यांनी अमेरिकेच्या गोलंदाजांना पह्डून काढले होते, मात्र गोलंदाजांकडून साथ न मिळाल्याने त्यांचा पराभव झाला होता. आता बघूया दोन पराभूत संघांत उद्या कोण बाजी मारणार ते.