कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो राजीनामा देणार

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी ते पंतप्रधान पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले आहे. ज्या क्षणी माझा पक्ष पंतप्रधानपदासाठी दुसरी व्यक्ती शोधेल त्यावेळी मी राजीनामा देईन असे ट्रुडो यांनी जाहीर केले आहे.

ट्रु़डो यांच्या राजीनाम्यासाठी त्यांच्या पक्षातूनच दबाव आहे. ”मला आमच्या लिबरल पार्टी या पक्षाच्या अध्यक्षपदाचा व पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यायचा आहे. या दोन्ही पदांसाठी योग्य व्यक्ती निवडली गेली की मी राजीनामा देईन, असे ट्रुडो यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.