
पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट बुक केलेल्या लक्ष्य सेनचा उद्यापासून सुरू होणाऱया कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद पटकाविण्याचा निर्धार असेल. ऑलिम्पिकची रंगीत तालीम असलेल्या या स्पर्धेत लयीमध्ये परतण्याची सेनला संधी असेल. लक्ष्य सेनने वर्षभरात एकही स्पर्धा जिंकलेली नाहीये. जागतिक क्रमवारीत 14 व्या स्थानी असलेल्या सेनला या स्पर्धेत चतुर्थ मानांकन देण्यात आले आहे. तो या स्पर्धेत बिगरमानांकित खेळाडूविरुद्ध आपल्या अभियानास प्रारंभ करेल. प्रियांशू राजावत, किरण जॉर्ज व आयुष शेट्टी हे आणखी तीन हिंदुस्थानी खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. महिला गटात मालविका बनसोड, अनुपमा उपाध्याय या एकेरीतील खेळाडूंसह पुरुष दुहेरीत कृष्ण प्रसाद गंगा-साई प्रतीक हे हिंदुस्थानी खेळाडू कॅनडा ओपनमध्ये काwशल्य पणाला लावणार आहेत.