कॅनडामध्ये खलिस्तान्यांचा मंदिरावर हल्ला; हिंदू भाविकांना मारहाण, पंतप्रधानांकडून निषेध

कॅनडाच्या ब्रॅम्पटन येथील एका मंदिरात खलिस्तान्यांनी रविवारी हिंदू भाविकांवर हल्ला केल्याची घटना घडली. यावर आता प्रधानमंत्री जस्टीन ट्रुड्रो यांनी सोमवारी प्रतिक्रिया देत या हल्ल्याचा निषेध केला आहे. ते म्हणाले हिंसाचार मान्य नाही. त्यांचा सोशल मीडीयावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हिडीओत ट्रुड्रो म्हणाले की, ब्रॅम्पटनमध्ये हिंदू सभा मंदिरात झालेला हिंसाचार मान्य नाही. कॅनडाच्या प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचे स्वातंत्र्य आणि सुरक्षित पद्धतीने तो पालन करण्याचा अधिकार आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये खलिस्तानी लाठ्या-काठ्यांनी हिंदू भाविकांवर हल्ला करताना दिसत आहेत. हल्लेखोरांच्या हातात खलिस्तानी झेंडे दिसत आहेत. मुलं आणि महिलांनाही मारहाण करताना दिसत होते.हल्ल्यापूर्वी खलिस्तानी समर्थकांचा समूह 1984 च्या शिखविरोधी दंगलीच्या स्मरणार्थ निदर्शने करत होता.

कॅनडामध्ये हिंदू श्रद्धाळूंवर हल्ला झाल्याने तणाव वाढला आहे. मंदिराच्या बाहेर मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पील भागातील पोलीस प्रमुख निशान दुरईप्पा म्हणाले की, आम्ही शांतिपूर्ण आणि सुरक्षितपणे विरोध करण्याचा सन्मान करतो. मात्र हिंसाचार आणि गुन्हेगारी कृत्ये खपवून घेणार नाही. अशा कृत्यांमध्ये गुंतलेल्यांना अटक केली जाईल.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुड्रो यांनी हिंदुस्थानी आणि कॅनेडीअन समुदायाला दिवाळीच्या शुभेच्छा. त्यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये व्हिडीओमध्ये ट्रुड्रो यांनी आपल्या मनगटावर बांधलेल्या धाग्यांकडे लक्ष वेधत मला या बांगड्या तेव्हा मिळाल्या जेव्हा मागच्या महिन्यात तीन वेगवेगळ्या हिंदू मंदिरात गेलो होतो. हे धागे आपले रक्षण करतात. हे धागे जोपर्यंत स्वत:हून खाली पडत नाही तोपर्यंत ते स्वत:हून पडत नाही.