
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून ते सतत चर्चेत आहेत. त्यांचे व्यापार धोरण आणि टेरिफच्या निर्णयामुळे जगाच्या अर्थव्यवस्थएवर मोठे संकट घोंघावत आहे. ट्रम्प यांनी नाट्यमयरित्या टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांची सहकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसची भूमिका स्पष्ट केली आहे.
एलॉन मस्क हे देशप्रेमी आहेत. अमेरिकेच्या विकासासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळेच त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. व्हाईट हाऊसमध्ये काम करताना त्यांची कोणतीही व्यावसायिक भूमिका किंवा हितसंबंध धोरणासाठी आडकाठी ठरणार नाही, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले. कोणताही राजकीय पार्श्वभूमी किंवा व्हाईट हाऊसचे कर्मचारी नसताना त्यांच्यावर मोठी जबाबदारी कशी सोपवण्यात आली, याबाबत बोलताना ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, तुम्ही मस्क यांनी व्हाईट हाऊसमधील कर्मचारी किंवा देशाचा सल्लागार असे काहीही समजा पण चे देशासाठी आणि माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत.
व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे की, मस्क त्यांच्या विविध व्यावसायिक हितसंबंधांमधील कोणतीही भूमिका आणि त्यांची सरकारी कार्यक्षमता यात काहीही अजसर ठरणार नाहीत. सरकारसाठी खर्च कमी करण्याच्या प्रयत्नांत ते महत्वाची भूमिका बाजवणार आहेत. ट्रम्प प्रशासनात मस्क यांची भूमिका एक कर्मचारी म्हणून असल्याचे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे.
सरकारी खर्च कमी करण्याच्या त्यांच्या मोहिमेदरम्यान मस्कच्या संभाव्य हितसंबंधांबद्दल ट्रम्प विचारले असता ते म्हणाले की, मस्क यांना कोणत्याही अवकाश-संबंधित सरकारी निर्णयांमध्ये भाग घेऊ देणार नाहीत. त्यांचा या क्षेत्राशी संबंध आणि अनुभव असला तरी आम्ही मस्क यांना त्यात सहभागी होऊ देणार नाही.
मस्क यांची ट्रम्प प्रशासनात भूमिका व्हाईट हाऊसचे कर्मचारी आणि राष्ट्रपतींचे वरिष्ठ सल्लागार म्हणून आहे. सरकारी खर्च कमी करणे आणि देशाच्या विकासासाठी योग्य त्या सूचना करणे याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मात्र, त्यांच्याकडे निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार देण्यात आलेला नाही.
व्यर्थ सरकारी खर्च कमी करण्याची जबाबदारी ट्रम्प यांनी मस्क यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची कपात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे मस्क यांच्याबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर ट्रम्प यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. मस्क माझ्या दृष्टीने देशप्रेमी आहेत. त्यामुळे आमच्या प्रशासनात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. तुम्ही त्यांना व्हाईट हाऊसचे कर्मचारी समजू शकता किंवा तुम्ही त्यांना सल्लागार समजा. तुम्हाला जे हवे ते समजा पण त्यांची भूमिका अमेरिकेसाठी महत्त्वाची ठरेल, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.