
छत्तीसगडमधील विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या आईडी स्फोटात सशस्त्र दलाचा एक जवान शहीद झाला. मनोज पुजारी (26) असे शहीद जवानाचे नाव आहे. तोयनार ते फरसेगढ दरम्यान मोरमेड गावातील जंगलात हा सोमवारी हा स्फोट झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तोयनार ते फरसेगढ दरम्यान रस्त्याचे बांधकाम सुरु आहे. या रस्त्याच्या सुरक्षेसाठी सीएएफ बटालियनच्या जवानांना गस्तीवर तैनात करण्यात आले होते. यादरम्यान सीएएफच्या 19 व्या बटालियनचे जवान मनोज पुजारी यांचा नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आईडी बॉम्बवर पाय पडला. यामुळे बॉम्बचा स्फोट झाला आणि यात मनोज पुजारी शहीद झाले.
शहीद जवानाचे पार्थिव जंगलातून बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेनंतर परिसरात नक्षलवाद्यांविरोधात अभियान सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.