
होळीच्या निमित्ताने एअर होस्टेससह कॅबिन क्रू ‘बलम पिचकारी’ या गाण्यावर ठेका धरत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडियोत सफेद कुर्ता आणि दुपट्टा घेऊन एअर होस्टेस बेधुंद डान्स करताना दिसत आहे. सोबत विमानातील प्रवासीही याचा आनंद लुटताना दिसत आहेत. स्पाईसजेटच्या विमानातील हा व्हिडीओ अनेकांना आवडला. मात्र व्हिडिओवरून इन्स्टाग्रामवर दोन गट पडल्याचे दिसून येतंय. काही नेटकऱ्यांनी केबिन क्रूच्या या कृतीचे कौतुक केले, तर काहींनी याला अनप्रोफेशनल म्हटले.