सी. आर. व्यास वंदना आजपासून

प्रतिष्ठेचा ‘सी. आर. व्यास वंदना’ संगीत समारोह 9 आणि 10 जानेवारी रोजी दादर येथील वीर सावरकर सभागृहात होईल. संगीत सोहळ्याचे हे 23 वे वर्ष आहे.

‘महाराष्ट्र ललित कलानिधी’ संस्थेच्या वतीने आयोजित पंडित सी. आर. व्यास यांच्या स्मृतीला समर्पित असा हा संगीत सोहळा आहे. गुरुवारी 9 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता धनंजय जोशी यांच्या गायनाने समारोहाला प्रारंभ होईल. त्यांना महेश कानोले (तबला), निरंजन लेले (हार्मोनियम) यांची साथ लाभेल. त्यानंतर गेली 50 वर्षे जगभरात मैफली गाजवणारे इमदाद खानी घराण्याचे सतारिये पंडित बुधादित्य मुखर्जी यांचे वादन ऐकायला मिळेल. तबला साथ सोमेन नंदी यांची असेल. 10 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता शर्वरी नागवेकर गायन सादर करतील. तबला साथ तनय रेगे, हार्मोनियम साथ ज्ञानेश्वर सोनवणे यांची असेल. समारोहाची सांगता प्रसिद्ध तबलावादक पंडी अनिन्दो चॅटर्जी आणि त्यांचा मुलगा अनुब्रता चॅटर्जी यांच्या तबला जुगलबंदाने होईल. हा कार्यक्रम विनामूल्य आहे.