विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 27 मार्चला पोटनिवडणूक

विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांची पोटनिवडणूक 27 मार्चला होणार आहे. या जागांची मुदत वेगवेगळ्या तारखांना संपत असल्याने प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र पोटनिवडणूक होईल. शिंदे गटाचे आमशा पाडवी, अजित पवार गटाचे राजेश विटेकर तर भाजपचे प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रमेश कराड हे विधानसभेवर निवडून गेल्याने ही पोटनिवडणूक होत आहे.