झोपेत चालण्याचा आजार बेतला जिवावर, 19 वर्षीय मुलाचा सहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू

अनेकांना झोपेत चालायचा सवय असतो. मात्र हीच सवय एकाच्या जीवावर बेतली आहे. मुंबईतील भायखळा येथे धक्कादायक घटना घडली आहे. एका 19 वर्षीय मुलाचा झोपेत चालताना सहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून त्याला सेफी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

मुस्तफा इब्राहिम चुनावाला (19) असे त्या मृत मुलाचे नाव आहे. भायखळा पोलीस स्थानकाच्या हद्दीत माझगाव येथे टॉवर नंबर 1, नेसबीट रोड येथे मुस्तफा राहत होता. त्याला झोपेत चालायची सवय होती. 30 जूनच्या मध्यरात्री तो झोपेतच सहाव्या मजल्यावर चालत गेला आणि खाली पडला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ उपचारासाठी तिथल्या सेफी रुग्णालयात नेण्यात आला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. त्याच्या मृत्यूने चुनावाला कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.