By-Election Date Change: उत्तर प्रदेश, पंजाब, केरळमधील पोटनिवडणुकीची तारीख बदलली, काय आहे कारण?

By-Election Date Change
By-Election Date Change

देशभरातील पोटनिवडणुकांसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), पंजाब (Punjab) आणि केरळमधील (Kerala) पोटनिवडणुकांच्या तारखा बदलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशच्या 9 विधानसभा जागांसह इतर राज्यांतील 14 जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या तारखेत बदल केला आहे. या जागांसाठी 13 नोव्हेंबरला मतदान होणार होते. मात्र आता 20 तारखेला मतदान होणार आहे.

का बदलण्यात आल्या निवडणुकीच्या तारखा?

उत्तर प्रदेशमध्ये भाजप, आरएलडी आणि बसपने मागणी केली होती की, कार्तिक पौर्णिमेच्या आधी जत्रेचे आयोजन केले जाते आणि लोक मोठ्या संख्येने गंगेत स्नान करतात. अशातच कार्तिक पौर्णिमा संपल्यानंतरच मतदान घेण्यात यावं. दुरीकडे कार्तिक पौर्णिमा आणि गुरुनानक देवजींचे प्रकाश पर्व 15 नोव्हेंबर रोजी साजरं केलं जातं. त्यामुळे पंजाबमध्येही अशीच मागणी करण्यात आली होती.

Jammu Kashmir: कलम 370 परत आणा; जम्मू-काश्मीर विधानसभेत पीडीपी आमदाराचा प्रस्ताव, सभागृहात गदारोळ

तसेच केरळमध्ये 13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान कलापथी रास्तोलसेवाम साजरा केला जाणार आहे. याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो. यामुळे निवडणूक आयोगाने विविध राजकीय पक्षांची केलेल्या मागण्या मान्य करत 20 नोव्हेंबरलाच मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पोटनिवडणुकांचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर करण्यात येणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांचे निकालही त्याच दिवशी जाहीर होणार आहेत. याशिवाय इतर अनेक जागांवर 20 नोव्हेंबरला पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय आयोगाने आधीच घेतला होता. त्यांच्या तारखेत कोणताही बदल होणार नाही. झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला एकाच फेरीत मतदान होणार आहे.