शेअर बाजारात ‘मंगल’वार, घसरगुंडी थांबली; अनेक स्टॉकमध्ये धमाकेदार तेजी

शेअर बाजारासाठी मंगळवारचा दिवस मंगल ठरला आहे. प्रिओपन मार्केटची सुरुवातच तेजीत झाली होती. त्यानंतर मार्केटने तेजी कायम ठेवली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 597 अंकांच्या वाढीने बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 168 अंकांच्या तेजीने बंद झाला. बाजारात आज अंबानी आणि अडानी यांच्या शेअरने जबरदस्त उसळी घेतली.

मुंबई शेअर बाजार सोमवारी 80,248 वर बंद झाला होता. आज बाजाराची सुरुवात होताच तो 80,529 वर पोहचला होता. दिवसभराच्या व्यवहारात तो 575 अंकांपर्यंत पोहचला होता. बाजार बंद होईपर्यंत बाजारात तेजी कायम होती. 597 अंकांच्या तेजीसह बाजार 80,845 वर बंद झाला. तर राष्ट्रीीय शेअर बाजाराचा निर्देशांक सोमवारी 24,276 वर बंद झाला होता. आज बाजाराची सुरुवात होताच तो 24,367 वर पोहचला होता. दिवसभराच्या व्यवहारात त्यात 160 अंकांची वाढ झाली. बाजार बंद होताना तो 24,457.15 अंकांपर्यंत तो पोहचला होता.

बाजाराच आज अंबानी यांचा रिलायन्स उद्योहसमुह टॉर गेनर ठरला आहे. तसेच NTPC, Axis Bank, SBI, L &T, UltraTech Cement, Tata Motors, HDFC Bank आणि HCL Tech शेयर तेजीत होते. त्याचप्रमाणे मिड आणि स्मॉलकैप शेयरमध्येही तेजी होती.