
क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली व्यावसायिकाची 22 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी मालाड पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. मालाड येथे तक्रारदार राहतात. काही दिवसांपूर्वी त्याना एक मेसेज आला. क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. या करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास कसा फायदा होतो अशा भूलथापा मारल्या. तसेच त्यांना क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास 10 ते 24 टक्के व्याज दिले जाईल असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदार याने 22 लाख 66 हजार रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणूक केल्यानंतर त्याना कोणताही नफा मिळाला नाही, तसेच त्यानी गुंतवणूक केलेली रक्कम त्याना दिली नाही. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने ते त्या ऑफिसमध्ये गेले. तेव्हा त्या ऑफिसला टाळे होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.