
गेल्या महिन्यात भारतीय शेअर ऑल टाईम हायवर पोहचला होता. त्यानंतर शुक्रवारपासून बाजारात मोठी घसरण सुरू झाली आहे. घसरणीचे सत्र सोमवारीही सुरुच होते. मात्र, तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार जागतिक अस्थिरतेचा भारतीय शेअर बाजारावर मंगळवारी सकाळी परिणाम झाला नाही. शेअर बाजाराची सुरुवात तेजीत झाली. मात्र, दुपारच्या सत्रात जोरदार विक्री झाल्याने दिवसभराच्या ऑल टाईम हायवरून निर्देशांकांची घसरण सुरू झाली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात बंद होताना 166.33 अकांची घसरण होत बाजार 78,593.07 अंकावर तर राष्ट्रीय शेअर बाजार 63.05 अकांच्या घसरणीसह 23,992.55 वर पोहचला होता.
सोमवारच्या घसरणीनंतर मंगळवारी बाजाराची सुरुवात तेजीने झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 1100 अंक तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 300 अंकांनी वाढला होता. मंगळवारी बाजाराने दिवसभराचा हाय गाठला होता. मात्र, दुपारच्या सत्रात युरोपीय बाजारातील घसरण आणि देशाच्या बाजारात झालेल्या जोरदार विक्रीमुळे बाजाराने तेजीकडून घसरणीकडे वाटचाल सुरू केली आणि बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांक 166.33 तर निफ्टी 63.05 अंकांच्या घसरणीवर बंद झाला. बँकिंग आणि मिडकॅप शेअरमध्ये जोरदार विक्री झाली.
गोदरेज प्रॉपर्टीज 3.49 टक्के, ब्रिटानिया 2.81 टक्के, इप्का लॅब 2.69 टक्के, आईजीएल 1.40 टक्के तेजीत होते. तर जेएसडब्ल्यु स्टील 2.41 टक्के, टेक महिंद्रा 2.07 टक्के, एल अँड टी 1.62 टक्के, एचयूएल 1.55 टक्के, टाटा स्टील 0.97 टक्कांनी वाढला होता. तसेच मेरिको 6.49 टक्के, एलआईसी हाउसिंग फाइनान्स 5 टक्के, पावर फाइनान्स 4.82 टक्के, एचडीएफसी लाइफ 4.40 टक्के, बाटा इंडिया 2.70 टक्के हे शेअर घसरणीने बंद झाले.
सकाळच्या सत्रात आलेल्या दमदार तेजीनंतर दुपारच्या सत्रात झालेल्या घरसणीने आजही अनेक गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. मंगळवारी एका दिवसात गुंतवणूकदारांचे 1.57 लाख कोटींचे नुकसान झाले. तर गेल्या दोन सत्रात गुंतवणूकदारांचे 17 लाख कोटी बुडाले. बॅकिंग आणि मिडकॅप सेक्टरमध्ये नफा वसूलीसाठी झालेल्या विक्रीमुळे बाजाराने तेजीकडून घसरणीकडे वाटचाल केली. त्यामुळे मंगळवारीही गुंतवणूकदारांचे नुकसान झाले.