
पुढील आठवड्यात मंगळवारी 23 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर हणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार दमदार वाटचाल करत होता. शेअर बाजार नवे उच्च्यांक गाठेल असे वाटत असतानाच शुक्रवारी बाजारात मोठी गिरावट झाली. नफा मिळवण्याच्या उद्देशाने शुक्रवारी मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आली. त्यामुळे बाजार कोसळला. शुक्रवारी बाजार कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 8 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.
बाजारात शुक्रवारी झालेल्या घसरणींचा सर्वाधिक फटाक स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअरला बसला आहे. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 739 अंकांनी घसरून 80,604 वर आला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 270 अकांनी घसरून 24,530 वर आला होता. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी दिवसभरात 8.07 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
बाजारात शुक्रवारी इन्फोसिस 1.92 टक्के, आयटीसी 0.89 टक्के,एशियन पेंट्स 0.53 टक्के, एचसीएल टेक 0.03 टक्के तेजीत बंद झाले. तर टाटास्टील 5.17, जेएसडब्लू स्टील 4.36, एनटीपीसी 3.51 टक्के, टाटा मोटर्स 3.43 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 3.28 टक्के, महिंद्रा 3.16 टक्के, विप्रो 2.78 टक्के, पॉवर ग्रिड 2.58 टक्के, रिलायन्स 1.92 टक्के, बजाज फायनान्स 2.44 टक्के घसरणीने बंद झाले. बाजारात शुक्रवारी झालेल्या कारभारात कोणतेही सेक्टर तेजीत नव्हते. एनर्जी सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. बाजारात झालेल्या या पडझडीमुळे Vix इंडेक्स 2.14 टक्के उसळून 14.82 वर आला होता.