दिल्ली सरकारने शनिवारी नागरी संरक्षण स्वयंसेवकांना पुन्हा नियुक्त करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषद घेत बस मार्शल पुन्हा तैनात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. तसेच येत्या सोमवारपासून नागरी संरक्षण स्वयंसेवकांना पुन्हा रोजगार मिळणार असल्याचे यावेळी आतिशी यांनी स्पष्ट केले.
बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना कोणत्याही अनुचित घटनेपासून संरक्षण मिळावे यासाठी बस मार्शलची नियुक्ती करण्यात आल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांनी सांगितले. पुढील चार महिन्यांसाठी हे मार्शल पुन्हा नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे 10 हजार नागरी संरक्षण स्वयंसेवकांना पुन्हा नोकऱ्या मिळणार आहेत. दिल्ली सरकारने अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली सर्व काम केले आहे असे आतिशी यांनी सांगितले.
मैं बस मार्शलों को आश्वस्त करती हूं कि आने वाले कुछ दिनों में ही बस मार्शलों की स्थायी नियुक्ति का प्रस्ताव LG के पास भेजेंगे।
जब तक इन्हें स्थायी नियुक्ति नहीं मिल जाती तब तक फरवरी के महीने तक बस मार्शलों को प्रदूषण के ख़िलाफ़ मुहीम में जोड़ा जा रहा है।
सोमवार से बस मार्शलों… pic.twitter.com/UOsBoecx6m
— AAP (@AamAadmiParty) November 9, 2024
बस मार्शलची कायमस्वरूपी नियुक्ती व्हावी यासाठीही आपण प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यासाठीचा प्रस्थाव आतिशी उपराज्यपालांकडे पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जोपर्यंत कायमस्वरुपी नियुक्त्या होत नाहीत तोपर्यंत दिल्लीच्या प्रदूषण थांबविण्याच्या मोहिमेत व्यस्त राहणार आहेत. त्यामुळे सध्या चार महिन्यांसाठी नेमलेल्या बस मार्शलचा प्रदूषणाविरोधातील मोहिमेत समावेश करण्यात येत आहे. असे यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी सांगितले.
सोमवारपासून बस मार्शलना कॉल आऊट नोटीस जारी केली जाईल. त्यानंतर मंगळवारपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणी करू शकतात. असे त्या म्हणाल्या.