अलिबागच्या वडखळ रोडजवळ एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. अलिबागवरून पनवेलच्या दिशेने जात असताना बस एक्सल तुटवल्यामुळे ही बस पलटली आहे. मात्र बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान या अपघातात 10 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच सध्या बसमधील इतर नागरिकांना सुखरुपपणे बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.