सिडनी कसोटी चांगलीच रंगात आली असून हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 181 धावांमध्ये गुंडाळत 4 धावांची आघाडी घेतली आहे. त्यानंतर यशस्वीने मिशेल स्टार्कला सलग तीन चौकार ठोकत चांगली सुरुवात केली. याच दरम्यान हिंदुस्थानी संघाचे टेन्शन वाढवणारी बातमी आली आहे. हिंदुस्थानचा कर्णधार जसप्रीत बुमराह सामना सुरू असताना मैदानातून बाहेर गेला. बुमराहच्या अनुपस्थितीत विराट कोहली याने संघाचे नेतृत्व केले.
सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशी शेवटच्या षटकात झालेल्या ड्रामामुळे क्रीडाप्रेमींचे दुसऱ्या दिवशीच्या खेळावर लक्ष लागले होते. दुसऱ्या दिवशीची सुरुवात बुमराहने झोकात केली आणि मार्नस लाबुशेनला विकेटमागे बाद केले. त्यानंतर सिराजनेही एगामागोमाग दोन विकेट घेतल्या. लंचपर्यंत ऑस्ट्रेलियाने 5 विकेट गमावून 101 धावा केल्या.
मी 2 मुलांचा बाप, कधी काय करायचं ते मला माहितीय! निवृत्तीच्या चर्चांवर रोहित शर्मा स्पष्टच बोलला
लंचनंतर जसप्रीत बुमराह याने एक षटक टाकले आणि तो मैदानाबाहेर गेला. या काळात विराट कोहली याने हिंदुस्थानच्या संघाचे नेतृत्व केले. त्यानंतर एक व्हिडीओ समोर आला आणि त्यात जसप्रीत बुमराह मैदान सोडताना दिसला. बुमराहने ट्रेनिंग किट घातली होती. त्यानंतर आणखी एका व्हिडीओमध्ये तो कारमध्ये बसून जाताना दिसला. त्याच्यासोबत सपोर्ट स्टाफही होता. बुमराहला दुखापत झाल्याची शक्यता असून त्याला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आल्याचे बोलले जात आहे. याबाबत अद्याप बीसीसीआयने अधिकृत माहिती दिलेली नाही.
Jasprit Bumrah has left the SCG: https://t.co/0nmjl6Qp2a pic.twitter.com/oQaygWRMyc
— cricket.com.au (@cricketcomau) January 4, 2025