
बुलढाणा वन मिशनच्या संदीप शेळके यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संदीप शेळके यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रासह सामाजिक, राजकीय, आरोग्य व महिला बचत गटात बुलढाणा वन मिशनच्या संदीप शेळके यांचा नावलौकिक आहे. संदीप शेळके लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उतरले होते. त्यांनी मंगळवारी मुंबईतील मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना सचिव विनायक राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत उपस्थित होते. तसेच महिला आघाडी जिल्हा संघटिका चंदाताई बढे, उपजिल्हा प्रमुख सुनील घाटे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, किसान सेना उपजिल्हा प्रमुख गजानन उबरहंडे, उपतालुका प्रमुख विजय ईतवारे यांची उपस्थिती होती.