
बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर कारला भीषण आग लागून दोघांचा होरपळून मृत्यू झाला तर कार चालक गंभीर जखमी झाला. अभिजीत चव्हाण असे जखमी चालकाचे नाव आहे. जखमी चालकाला उपचारासाठी सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस तपास करत आहेत.
मुंबईहून अकोल्याला जाणाऱ्या कारला समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरवर चेनेज 318.8 जवळ कार अनियंत्रित झाल्याने साईड बॅरिकेटला धडकली. यानंतर कारने पेट घेतला. या आगीत कारमधील दोघांचा जळून मृत्यू झाला. तर कार चालक गंभीर जखमी झाला. गणेशे टेकाडे आणि राजू जायसवाल अशी मयतांची नावे आहेत.