Buldhana News – बुलढाण्यात उष्णाघाताचा पहिला बळी, शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू

राज्यात तापामानाने उच्चांकी गाठली आहे. भीषण गरमीने नागरिकांची लाही लाही होत आहे. विदर्भात उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच त्रास होत आहे. बुलढाण्यात उष्माघातामुळे एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आहे. विद्यार्थ्याला अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात नेत होते. मात्र तत्पूर्वी वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

संस्कार सोनटक्के हा शेगाव येथील संत गजानन महाराज ज्ञानपीठ विद्यालयात इयत्ता सहावीत शिकत होता. उष्माघातामुळे संस्कारला अस्वस्थ वाटू लागले. शाळेतून घरी परतल्यानंतर त्याची तब्येत बिघडली. संस्कारला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला.