गुजरातच्या सुरतमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. पाच मजल्यांची इरमात कोसळून ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सुरतमध्ये सचिन जीआयडीसी भागात ही दुर्घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. मदत आणि बचावकार्य सुरू आहे. कुठल्या कारणामुळे इमारत कोसळली हे अद्याप कळू
इमारत अचानक कोसळल्याने तिथे राहत असलेले भाडेकरू ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाकडून ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. ढिगाऱ्याखालून एका महिलेला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे.
सचिन GIDC भागात पाली गावात 2017 मध्ये ही इमारत बांधण्यात आली होती. आता या दुर्घटनेत इमारतीत राहणारे 10 ते 15 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. मदत आणि बचावकार्य सुरू आहे. या इमारतीत 30 फ्लॅट होते. आणि त्यात पाच ते सहा कुटुंब राहत होते, अशी माहिती सुरतचे पोलीस आयुक्त अनुपम सिंह गहलोत यांनी दिली.