
मुंबईतील आझाद, ओव्हल आणि क्रॉस मैदानसारख्या ऐतिहासिक क्रिकेट मैदानांवर मूलभूत स्वच्छता सुविधा अपुरी पडत आहे. इथे पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंसाठी योग्य स्वच्छतागृहे उपलब्ध नाहीत. मुंबईत तळागाळातील क्रिकेट विकासाला पाठिंबा देण्यासाठी सरकारने क्रीडा विभाग आणि मुंबई महापालिका यांच्याशी समन्वय साधून या मैदानांवर आधुनिक शौचालय सुविधा, कपडे बदलण्याच्या खोल्या आणि स्वच्छतेच्या पायाभूत सुविधा बसवण्यासाठी आणि देखभालीसाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी मिलिंद नार्वेकर यांनी विशेष उल्लेख सूचनेद्वारे परिषदेत केली.