Budget 2024 – देशासाठी नव्हे, तर खुर्ची वाचवण्यासाठीच बनवले बजेट ; संजय राऊत यांचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या 10 वर्षांपासून फक्त बोलत आहेत. ते फक्त आश्वासने देत आहेत. मात्र, गेल्या 10 वर्षात सर्वसामान्य जनता, शेतकरी, बेरोजगार तरुण, विद्यार्थी ,महिला यांना काय मिळाले.मोदी सातत्याने 10 वर्षे बोलत आहे. मात्र, देशातील जनतेला काय मिळाले हे त्यांनी सांगावे, असा सवालही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

याआधी बजेट फक्त एका राज्यासाठी बनवण्यात येत होते. आधी फक्त गुजरातसाठी बजेट असायचे. आता खुर्ची वाचवण्यासाठी त्यात दोन राज्यांची भर पडली आहे. खुर्ची वाचवण्यासाठी त्यांना असे करणे भाग होते, असा टोलाही राऊत यांनी लगावला. त्यामुळे हे बजेट देशासाठी नसून खुर्ची वाचवण्यासाठी करण्यात आले आहे, असे आपण पहिल्यांदाच बघत आहोत, अशा शब्दांत त्यांनी केंद्रीय अर्थंसकल्पावर हल्ला चढवला.

गेल्या दहा वर्षात अर्थसंकल्पातून सामान्य माणूस, शेतकरी, विद्यार्थ्यांना काय मिळाले?… पूर्वीचा अर्थसंकल्प गुजरातचा एकच राज्य असायचा, आता आणखी दोन राज्ये आहेत. त्यात भर घातली आहे… मी पहिल्यांदा पाहिलं आहे की, देशाच्या कल्याणासाठी नव्हे तर सरकार वाचवण्यासाठी बजेट बनवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. या देशात मोठमोठे विवाह सोहळे आणि बजेटवर मोठ्यामोठ्या बाता होत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.