Budget 2024 – हा तर खुर्ची बचाओ बजेट…; मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर राहुल गांधी यांची सडकून टीका

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात मुंबई आणि महाराष्ट्राचा साधा उल्लेखही नाही. यामुळे महाराष्ट्रातून या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त होत आहे. विरोधी पक्षांनीही अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनीही अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. हा खुर्ची बचाओ बजेट… असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

सरकारमधील मित्रपक्षांना खुश करणारा करणारा हा अर्थसंकल्प आहे. बजेटमध्ये इतर राज्यांच्या तोंडाला पाने पुसत मित्रपक्षांना पोकळ आश्वासनं दिले गेली आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. हा अर्थसंकल्प मित्रपक्षांना खुश करण्यासाठी आणण्यासाठी आला आहे. अर्थसंकल्पातून AA (अदानी, अंबानी) चा फायदा होईल आणि सामान्य नागरीकांना कोणताही दिलासा मिळणार नाही. हा कॉपी पेस्ट बजेट आहे. हा बजेट काँग्रेसचा जाहीरनामा आणि मागच्या जाहीरनाम्याची कॉपी असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.

‘काँग्रेसचा न्याय अजेंडाही नीट कॉप करता आला नाही’

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही हा कॉपी पेस्ट बजेट असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचा न्याय अजेंडाही मोदी सरकार नीट कॉपी करता आला नाही. मोदी सरकारचा बजेट हा आघाडीतील मित्रपक्षांना फसवणारा आहे. एनडीए वाचवण्यासाठी उरल्यासुरल्या रेवड्या वाटप करण्याचा हा प्रकार आहे. हा देशाच्या विकासाचा नाही तर मोदी सरकार बाचाओ बजेट आहे, असा टोला मल्लिकार्जुन खरगे यांनी लगावला आहे.