बिहार व आंध्र प्रदेशच्या टेकूवर उभ्या असलेल्या केंद्र सरकारने त्यांच्या पहिल्या अर्थसंकल्पात दोन्ही राज्यांना झुकतं माप दिलं आहे. बिहारमध्ये रस्ते बांधणीसाठी 26 हजार कोटी तर नवे मेडिकल कॉलेज बांधण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तर आंध्र प्रदेशला अतिरिक्त 15 हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे.
– बिहारमधील पाटणा पुरण्या एक्सप्रेस वे, बुक्सर बागलपूर एक्सप्रेसवे, बोधगया राजगिर, वैशाली दरभंगा या महामार्गांसाठी व बुक्सर येथे गंगा नदीवरील पुलासाठी हे 26 हजार कोटी देण्यात आले आहे.
– पूर्वीकडील राज्य असलेल्या बिहार, झारखंड, ओडीशा, आंध्र प्रदेशसाठी पूर्वोदय स्किम लागू करण्यात आली आहे.
– आंध्र प्रदेशला राजधानीच्या विकासासाठी अतिरिक्त 15 हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे.
– बिहारमध्ये महाबोधी कॉरिडोअर साठी विशेष निधी
– नालंदा विद्यापीठात पर्य़टन केंद्र उभारण्यासाठी विशेष निधी
– बिहारमधील पर्यटन वाढवण्यावर भर