
उत्तर प्रदेशातील बदायूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने पत्नीच्या विरहातून आपला प्रायव्हेट पार्ट कापला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. यावेळी तरुणाच्या नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील ददमाई गावात घडली. या एक वर्षापूर्वी त्याच्या पत्नीचे निधन झाले होते. त्याच्या पत्नीचे निधन होऊन 12 महिने झाले होते. पण तरीही तरुण हे दु:ख पचवू शकला नाही. तो रोज पत्नीच्या विरहात झुरत बसायचा. त्याचे असे हाल त्यांच्या कुटुंबीयांना बघवत नव्हते. त्यामुळे त्यांनी पीडित तरुणाचे दुसरे लग्न लावण्याचे ठरवले होते. पण तरूण आपल्या पत्नीला विसरायला तयार नव्हता.
दरम्यान, एक दिवस पीडित तरुणाने पत्नीच्या आठवणीत टोकाचे पाऊल उचलले. त्याचे कुटुंबीय शेतीच्या कामासाठी घराबाहेर गेले होते. यावेळी त्यांने एका धारदार शस्त्राने आपले गुप्तांगच कापले. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणाची माहिती मिळताच त्याच्या घरच्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.