बीटेकच्या विद्यार्थ्याला मिळाले 1.03 कोटीचे पॅकेज

बीटेकच्या अंतिम वर्षाला असलेल्या एका विद्यार्थ्याला तब्बल 1.03 कोटी रुपयांच्या वार्षिक पॅकेजची नोकरी मिळाली आहे. हा विद्यार्थी रोबोटिक्स आणि ऑटोमेशनमध्ये बीटेक करत आहेत. बेतिरेड्डी नागा वामसी रेड्डी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. मे 2025 मध्ये त्याचे बीटेक पूर्ण होईल. एका प्रसिद्ध एआय रोबोटिक्स फर्मने विद्यार्थ्याला नियुक्ती पत्र दिले आहे. बीटेकच्या एकूण 7 हजार 361 विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या नोकरीचे ऑफर लेटर मिळाले आहेत. यात ऑल्टो नेटवर्क्स, न्यूटॅनिक्स, मायक्रोसॉफ्ट, सिस्को, पेपाल आणि ऍमेझॉनचा समावेश होता.