देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल सात नव्या सेवा देणार आहे. त्यासोबत हायस्पीड इंटरनेटही देणार आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. पंपनी लवकरच आपल्या फोन जी आणि फाईव्ह जी सेवांची सुरुवात करणार असून त्यापूर्वीच कंपनीने आपली सेवा आणखी अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कंपनीने आज नवा लोगो लाँच केला आहे.
सायबर क्राईममध्ये प्रचंड वाढ झाली असून कोटय़वधींची फसवणूक होत आहे. ही फसवणूक रोखण्यासाठी बीएसएनएल स्पॅम फ्री नेटवर्क देणार आहे. स्पॅम-ब्लॉकिंग तंत्रज्ञानामुळे फिशिंग आणि फसवणुकीचे मेसेज ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापासून रोखले जातील आणि अशा मेसेजपासून ग्राहकांना सावध केले जाणार आहे. दरम्यान, बीएसएनल हिंदुस्थानात पहिल्यांदा फायबर आधारित इंट्रानेट टीव्ही सेवा सुरू करणार आहे.