भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ही सरकारी टेलिकॉम कंपनी आपले 4जी नेटवर्क वाढवण्यासाठी सातत्याने टॉवर्स बसवत आहे. बीएसएनएल कंपनीने आपली 3जी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका लाखो ग्राहकांना बसेल. बीएसएनएल15 जानेवारीपासून पाटण्यातील 3 जी सेवा बंद करणार आहे. यापूर्वी बीएसएनएलने पहिल्या टप्प्यात मुंगेर, खगड़िया, बेगूसराय, कटिहार आणि मोतिहारी मध्ये 3 जी नेटवर्क बंद केले आहे. यामुळे 3जी सिम असलेल्या ग्राहकांना केवळ कॉलिंगची सुविधा मिळणार आहे, डेटाची सुविधा मिळणार नाही. ग्राहकांचा चांगले नेटकर्क मिळाके तसेच इंटरनेटची सुकिधा जलद मिळाकी यासाठी बीएसएनएलचे हे पाऊल उचलले आहे. 4 जी आणि 5 जी सेकांमुळे ग्राहकांना अद्ययाकत तंत्रज्ञानाचा लाभ मिळेल. अलिकडे बीएसएनएलच्या ग्राहकांच्या संख्येत काढ झाल्याचे दिसून येतंय. याचे कारण म्हणजे खासगी टेलिकॉम कंपन्यांनी काढकलेले रिचार्ज दर.
ग्राहकांना मिळणार मोफत नवीन सिम
- बीएसएनल 3जी सिमच्या बदल्यात 4 जी सिमकार्ड घेऊ शकतील. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यासाठी ग्राहक आपल्या जवळच्या कस्टमर केअर सेंटर किंवा बीएसएनएल कार्यालयात जाऊन नवीन सिम खरेदी करू शकतात. तिथे जुने सिम जमा केल्यास त्या बदल्यात तुम्हाला नवीन सिम मिळेल.
- 2017 पूर्वी देण्यात आलेले सिम बदलण्यात येत आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन सिम 5 जी देखील सपोर्ट करेल. राज्यातील विविध जिह्यांमध्ये 4 जी नेटवर्क पूर्णपणे अद्ययावत करण्यात आले आहे. त्यामुळे 3 जी नेटवर्क बंद करण्यात आले आहे.