मुंबई शेअर बाजारात उत्साह; निर्देशांक 82,000 पार, निफ्टीची ऐतिहासिक कामगिरी

उद्योग जगतातील सकारात्मक संकेतांमुळे मुंबई बाजारात आज चांगलाच उत्साह पाहायला मिळाला. मुंबई शेअर बाजार निर्देशांकाने 200 अंकांहून अधिकची उसळी घेतली आहे. तर निफ्टीने प्रथमच 25,000 चा टप्पा ओलांडला आहे. निफ्टीची ही ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे.

मुंबई शेअर बाजार निर्देशांक सकाळी 9:21 वाजता 334.83 अंकांनी 82,076.17 वर होता, तर निफ्टी देखील 104.70 अंकांनी वाढून 25,055.85 वर व्यापार करत होता.

मारुती सुझुकी, कोल इंडिया, हिंदाल्को, जेएसडब्ल्यू स्टील आणि पॉवर ग्रिड हे निफ्टी 50 मधील पहिले पाच लाभधारक होते.

दुसरीकडे, M&M, BPCL, Hero MotoCorp, Sun Pharma आणि Eicher Motors यांचा सर्वाधिक तोटा झाल्याचं पाहायला मिळालं.