
फिटनेससह पौष्टिक आहाराला प्राधान्य देणाऱ्या हिंदुस्थानातील एकमेव रनिंग क्लब असलेल्या ब्रंच क्लबने गणितीय स्थिरांक पाय डेचे वार्षिक सिलेब्रेशन करण्यासाठी येत्या रविवारी 9 मार्चला कौटुंबिक अशा पाचव्या ‘पिझ्झा रन’चे आयोजन केले आहे. एखाद्या कौटुंबिक सोहळ्याप्रमाणे होणाऱ्या या रनमध्ये 3 वर्षांपासून 80 वर्षांपर्यंतचे वयस्कर शेकडो धावपटू सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा अंधेरी पश्चिमेला लोखंडवाला बॅक रोड, टीम हॉर्टनसमोर सकाळी 7 वाजता आयोजित केली जाणार आहे. 3.14 कि.मी. अंतराच्या या धम्माल शर्यतीत पिझ्झा खात धावण्याचा आनंद घेण्याची संधी धावपटूंना मिळते.
दरवर्षी गणितीय स्थिरांक पाय डेचा वार्षिकोत्सव 14 मार्चला साजरा केला जातो. या सोहळ्यात गणिताची आवड, धावणे आणि पिझ्झा म्हणजे खाणं, या साऱ्यांचे योग पिझ्झा रनच्या माध्यमातून जुळवून आणले जातात. या धम्माल रनमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी आनंद (9833216566) आणि रिचा आहुजा (9833391431) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.