रत्नागिरीत ब्राऊन हेरॉईन सापडले; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

रत्नागिरीचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक गस्त घालत असताना पथकाने ब्राऊन हेरॉईन या अंमली पदार्थाच्या 405 पुड्या घेऊन जाणाऱ्या तिघांना पकडले. त्यांच्याकडील ब्राऊन हेरॉईन आणि अन्य साहित्य असा 1 लाख 45 हजार 750 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

एकता नगर परिसरात गस्त घालताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकाला तीन जणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. आरोपी रूउफ इक्बाल डोंगरकर (वय 35,रा.कर्ला), नझीर अहमद मोहम्मद वस्ता (वय 38, रा.राजिवडा) आणि राहील अजीज सुवर्णदुर्गकर (वय 29, रा.राजिवडा) या तिघांची पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्याकडे ब्राऊन हेरॉईनच्या 405 पुड्या सापडल्या. त्यांना अटक करण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ,शांताराम झोरे,विजय आंबेकर,दिवराज पाटील आणि विवेक रसाळ यांनी केली.