पत्नीला मारहाण करणाऱया भावाची हत्या 

दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करणाऱया भावाची त्याच्या पित्यासह लहान भावाने हत्या केल्याची घटना अंधेरी परिसरात घडली. नीलेश मारुती सूर्यवंशी असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मारुती सूर्यवंशी आणि नितीन सूर्यवंशीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.

नीलेश हा एमआयडीसी येथील हर हर चाळीत राहत होता. तो बेरोजगार होता. तो रोज नशा करून घरी आल्यावर घरच्यांना त्रास देत असायचा. तसेच पत्नीलादेखील मारहाण करायचा. शुक्रवारी रात्री तो घरी आला. त्याने घरी पुन्हा गोंधळ घालून त्याच्या पत्नीला मारहाण करून तो शिवीगाळ करू लागला. तेव्हा मारुती आणि नितीनने त्याला जाब विचारला. त्यावरून त्याच्यात वाद झाला. रोजच्या त्रासाला पंटाळून त्या दोघांनी नीलेशच्या डोक्यात बॅट मारली.

बॅट मारल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर ते दोघे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गेले. घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी नीलेशला रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एमआयडीसी पोलिसांनी मारुती आणि नितीनविरोधात गुन्हा नोंद केला. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.