
ब्रिटनमधील विरोधी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाप्रकरणी ब्रिटिश सरकारने 13 एप्रिलपूर्वी हिंदुस्थानातील जनतेची औपचारित माफी मागावी अशी मागणी केली आहे. जालियनवाला हत्याकांड ब्रिटिश साम्राज्यावरील कलंक आहे. यात 1500 नागरिकांचा मृत्यू तर 1200 जण जखमी झाले होते. दरम्यान, ब्रिटनने 106 वर्षे जुन्या या घटनेबद्दल हिंदुस्थानींची माफी मागावी, असा प्रस्ताव यावेळी ठेवण्यात आला. आता येत्या 13 एप्रिल 2025 ला जालियनवाला बाग हत्याकांडाचा 106 वा वर्धापन दिवस आहे.