ब्रिटिश लेखिका समांथा हार्वे यांच्या ऑर्बिटल कादंबरीला 2024 चा बुकर पुरस्कार मिळाला आहे. ऑर्बिटल ही बुकर जिंकणारी अवकाश क्षेत्रावर आधारित पहिलीच कादंबरी आहे. पुरस्काराची रक्कम 50 हजार पौंड इतकी आहे. या कादंबरीच्या कथानकाचा संपूर्ण कालावधी 24 तासांचा असून पृष्ठांची संख्या केवळ 136 इतकी आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील सहा अंतराळवीर आणि त्यांचा एक दिवसाचा प्रवास या कथेवर आधारित असलेली ही कादंबरी यंदा ब्रिटनमधील सर्वोच्च खपाचे पुस्तक ठरले आहे.