घर विकून महिलेची जगभ्रमंती

वेगवेगळ्या देशांत फिरण्याची अनेकांना आवड असते. आपली आवड जोपासण्यासाठी काही लोक वाट्टेल ते करतात. ब्रिटनमधील एका महिलेने जगभ्रमंती करण्यासाठी राहते घर विकले आहे. लिन स्टेफिनसन असे या महिलेचे नाव आहे. ती 61 वर्षांची असून ब्रिटनमधील नॉटिंघमशायरच्या कार्लटन या शहरातील रहिवासी आहे. लिनला वेगवेगळ्या देशांत आणि शहरांत फिरायची आवड आहे.

कोरोना काळात घरात बसून त्रासलेल्या लिन यांनी कोरोना संपल्यानंतर जगभर फिरण्याचा निर्णय घेतला. कोरोना संपताच लिन यांनी जगभ्रमंती करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत 167 देशांचा दौरा केला आहे. लिनने दोन वर्षांपूर्वीच राहते घर विकून टाकले आहे. जग पाहणे आणि जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जगात लोक मोठ्या मनाचे आहेत. लिन आता आपल्या इन्स्टाग्रामवर आपल्या जगभर प्रवासासंबंधीचे फोटो आणि व्हिडीओज पोस्ट करते.