बिहारमध्ये आठवडाभरात पूल कोसळण्याची तिसरी घटना घडली. मोतिहारीमध्ये बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला. दोन कोटी रुपये खर्चून त्याचे बांधकाम सुरू होते. याआधी अररिया आणि सिवानमध्ये पूल कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे बिहारमधील सार्वजनिक कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पूर्व चंपारणच्या मोतिहारीच्या घोरासहन ब्लॉकमधील चैनपूर स्टेशनकडे जाणाऱया मार्गावर शनिवारी पूल कोसळला. पुलाची लांबी अंदाजे 50 फूट होती. पुलाच्या कास्टिंगचे काम झाले होते.
सिवानमध्ये जीवितहानी नाही
n बिहारच्या सिवानमध्येही शनिवारी गावांना जोडणारा छोटा पूल कोसळला. हा दारौंडा आणि महाराजगंज ब्लॉकमधील गावांना जोडणारा पूल आहे.
n जिल्हा दंडाधिकारी मुकुल कुमार गुप्ता यांनी सांगितले की, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. प्रथमदर्शनी असे दिसतेय की, कालव्यातून पाणी सोडले जात असताना खांब कोसळले.
अररिया दुर्घटनेची चौकशी सुरू
मंगळवारी अररिया जिह्यात नवीन बांधलेला अंदाजे 180 मीटर लांबीचा पूल कोसळला. अररिया पुलाच्या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱयांवर ग्रामीण बांधकाम विभागाने विभागीय कारवाई सुरू केली आहे.