नवरदेवाच्या मित्रांनी मैत्रीणींवर केल्या अश्लील कमेंट्स, संतापलेल्या नवरीने लग्नच मोडले

नवरदेवाच्या मित्रांमुळे लग्न मोडल्याची घटना उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये उघडकीस आली. नवरदेवाच्या मित्रांनी नवरीच्या मैत्रिणीबद्दल अश्लिल कमेंट केल्याने भर मंडपात गोंधळ उडाला. हा सर्व वाद कॅमेऱयात कैद झाला. ज्याचे मित्र मुलींबद्दल घाणेरडे विचार करत असतील, अशा पुरुषासोबत आपल्याला लग्न करायचे नाही, असे सांगत नवरीने हे लग्न मोडत असल्याचे सांगितले. वधू आणि वरांकडील मंडळीमध्ये आधी वाद आणि नंतर हाणामारी झाली. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या. यात अनेक जण जखमी झाले. काही जणांनी दगडफेकही केल्याचे सांगितले जाते. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी दोन्ही बाजुंनी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.