
‘मेट्रो-7 अ’ प्रकल्पातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थानक ते एअरपोर्ट कॉलनी स्थानकदरम्यानच्या 1.65 किलोमीटर लांबीच्या भुयारी बोगद्याचे ‘ब्रेक थ्रू’ गुरुवारी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. या मेट्रो मार्गामुळे मुंबईतील विविध मेट्रो मार्ग थेट मुंबई विमानतळापर्यंत मेट्रोने जोडले जाणार आहेत.
मेट्रो-7 अ’ मार्गाची लांबी 3.4 किलोमीटर असून त्यापैकी उन्नत मार्ग 0.94 किलोमीटर, तर भूमिगत मार्ग 2.50 किलोमीटर आहे. या मार्गावर दोन स्थानके आहेत. त्यापैकी एअरपोर्ट कॉलनी स्थानक उन्नत मार्गावर तर विमानतळ स्थानक भूमिगत मार्गावर असणार आहे. गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाविषयी माहिती जाणून घेतली. तसेच कळ दाबून ‘ब्रेक थ्रू’ कामाला सुरुवात केली.