बुधवारी पहाटे जम्मूमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला आहे. या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (BSF) एक जवान जखमी झाला, अशी माहिती PTI या वृत्तसंस्थेकडून देण्यात आली आहे.
हिंदुस्थानी जवानांनी देखील नियंत्रण रेषेच्या पलीकडून होत असलेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं.
STORY | BSF trooper injured as Pakistan violates ceasefire along border in Jammu
READ: https://t.co/X1Ce6Y0IM9 pic.twitter.com/jHkTazuFdZ
— Press Trust of India (@PTI_News) September 11, 2024
‘पहाटे 2.35 च्या सुमारास, अखनूर भागात सीमेपलीकडून अचानक गोळीबार सुरू झाला आणि त्याला BSF ने चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानच्या गोळीबारात BSF चा एक जवान जखमी झाला’, अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्यानं PTI कडे दिली.