
अतिवृष्टीचा फटका मुंबई-गोवा महामार्गापाठोपाठ कोकण रेल्वेला बसला आहे. खेड ते दिवाणखवटी रेल्वेमार्गादरम्यान रविवारी सायंकाळी दरड कोसळली. दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वे गाड्या थांबविण्यात आल्या आहेत. दरड हटविण्यासाठी साधारण अडीच तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.दरड हटविण्याचे काम सुरू आहे. कोकण रेल्वेसेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. तसेच मुंबई गोवा- महामार्ग आणि कोकण रेल्वे दोन्ही ठप्प झाल्याने अनेक प्रवासी खाळंबले आहेत.