हॉलीवूड स्टार 61व्या वर्षी बांधणार लग्नगाठ

हॉलीवूडचा सुपरस्टार ब्रॅड पिट तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार आहे. 61 व्या वर्षी गर्लफ्रेंड इनेस डी रामोनसोबत आयुष्याची नवीन सुरुवात करणार आहे. हे दोघे 2022 पासून एकमेकांना डेट करत आहेत. ब्रॅड पिटने सहा आठवडय़ांच्या शूटिंगसाठी न्यूझीलंडला जाण्याआधी इनेस डी रामोनला प्रपोज केले. रामोन हिचे लग्न झालेले असून ती सध्या घटस्फोटीत आहे, तर ब्रॅड पिटने अँजेलिना जोलीशी घटस्पह्ट घेतला आहे. इनेसने पॉल वेस्लेसोबत लग्न केल्यानंतर तीन वर्षांनंतर घटस्पह्ट घेतला. रामोन ही ज्वेलरी डिझायनर म्हणून प्रसिद्ध आहे. ब्रॅड पिटने सर्वात आधी अभिनेत्री जेनिफर एनिस्टनशी 2000 साली विवाह केला होता, परंतु त्यांचे लग्न जास्त काळ टिकले नाही. 2005 मध्ये ‘मिस्टर एंड मिसेज स्मिथ’ या चित्रपटाच्या शूटिंगवेळी अँजेलिनासोबत सूत जुळले.