बंगळूरुमध्ये एका महिलेचा खून करून तिचे 50 तुकडे करण्यात आले होते. या प्रकरणी मृत महिलेच्या पतीने मोठा दावा केला आहे. आपल्या पत्नीचे एका तरुणासोबत विवाहबाह्य संबंध होते, त्यानेच आपल्या पत्नीचा खून करून तिचे तुकडे केले असा दावा पतीने केला आहे.
बंगरुळूमध्ये महालक्ष्मी या 29 वर्षीय महिलेचा खून करून 50 तुकडे करण्यात आले होते. हे तुकडे घरातल्या फ्रिजमध्येही ठेवण्यात आले होते. या प्रकरणी महिलेचे पती हेमंत दास यांनी मोठा दावा केला आहे. महालक्ष्मी आपल्या पतीपासून वेगळ्या राहत होत्या. या काळात महालक्ष्मी अशरफ नावाच्या तरुणासोबत रिलेशनशिपमध्ये होत्या असा दावा पती हेमंत दास यांनी केला आहे. तसेच अशरफनेच महालक्ष्मीचा खून करून तिचे तुकडे केले असा आरोप दास यांनी केला आहे.
अशरफ उत्तराखंडचा रहिवासी असून तो बंगरुळूत सलूनमध्ये काम करत होता. हेमंत दास आणि महालक्ष्मी यांचा फक्त सहा महिने संसार चालला. त्यानंत दोघे विभक्त झाले. महालक्ष्मी आणि अशरफमध्ये विवाह्यबाह्य संबंध होते आणि त्यानेच लक्ष्मीचा खून केल्याचा आरोपही दास यांनी केला आहे.