रिल्सच्या नादात तरुणाने ओठांना लावला सुपरग्लू, नंतर झाली बिकट अवस्था

अलिकडे सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोकं वाटेल ते करतात. नुकतेच फिलीपीन्समधून एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. फिलीपीन्सच्या एका तरुणाला रिल्स बनवणे चांगलेच महागात पडले आहे. रिल्सच्या नादात या तरुणाने ओठांना सुपरग्लू लावला त्यानंतर असे काही झाले की तरुणावर रडण्याची वेळ आली.

या तरुणाने रिल्स बनविण्यासाठी त्याच्या ओठांवर सुपरग्लू लावला आणि त्याचे ओठच चिकटले. गंमत करायला गेला आणि  त्याच्याच अंगाशी आला. त्याच्या या कृतीवर हसावे की रडावे हे त्यालाच समजेना,अशी त्याची अवस्था झाली होती. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर बॅडिस टीव्ही नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला होता. आतापर्यंत 6.7 दशलक्षपेक्षा जास्त वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. व्हिडिओमध्ये, तो तरुण एका दुकानात बसलेला दिसत आहे, जिथे त्याने गमतीने कॅमेऱ्यासमोर सुपरग्लूची ट्यूब दाखवली आणि नंतर ती आपल्या ओठांवर लावली.

सुरुवातीला तो त्याच्या कृतीवर हसताना दिसतो, पण काही सेकंदातच परिस्थिती बदलते. सुपरग्लूमुळे त्याचे ओठ पूर्णपणे चिकटतात. तो पुन्हा पुन्हा ओठ उघडण्याचा प्रयत्न करतो, पण काही उपयोग होत नाही. ओठ उघडत नसल्याने मग मात्र तो गंभीर होऊन रडवेला होतो. व्हिडिओमध्ये तो रडताना आणि दुकानातून बाहेर पडताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Badis TV (@badis_tv)

हा व्हिडिओ इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला आहे . लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहीले आहे की, थोडे कोमट पाणी लावा. तर अन्य युजरने लिहीले की, आता ओठ उघडण्याचा प्रश्नच येत नाही, विनोदातही धोकादायक गोष्टी करताना विचार करावा.