ऐकावे ते नवलच! कर्नाटकात जन्मलेल्या मुलाला 25 बोटे

कर्नाटकात जन्म झालेल्या एका मुलाला 25 बोटे आहेत. मुलाच्या दोन्ही पायाला 6-6 बोटे आहेत. तर एका हाताला 6 तर दुसऱ्या हाताला 7 बोटे आहेत. अशी एकूण 25 बोटे आहेत. हे पाहून डॉक्टरही हैराण झाले आहेत. या मुलाच्या जन्मानंतर मुलाच्या वडिलांनी आनंद व्यक्त केला आहे. मुलगा आणि आई दोन्ही सुखरूप आहेत, असे डॉक्टर पार्वती हिरेमठ यांनी सांगितले. राजस्थानच्या डीग जिह्यातही अशीच घटना समोर आली होती.