माझा नवरा समलैंगिक, त्याला मुलांमध्ये इंटरेस्ट! हिंदुस्थानच्या माजी कर्णधारावर वर्ल्ड चॅम्पियन पत्नीचा गंभीर आरोप

हरयाणातील हिसार येथील वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर स्वीटी बूरा आणि तिचा पती, हिंदुस्थानच्या कबड्डी संघाचा माजी कर्णधार व भाजप नेता दीपक हुड्डा यांच्यातील वाद वाढतच चालला आहे. स्वीटी बूरा हिने पोलीस स्थानकामध्ये दीपक हुड्डा याला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर तिने आता सोशल मीडियावर पतीसंबंधी एक मोठा दावा केला आहे.

माझा नवरा समलैंगिक असून त्याला मुलांमध्ये इंटरेस्ट आहे, असा दावा स्वीटीने केला. याचा व्हिडीओ तिने स्वत: आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. दीपकच्या समलैंगिक संबंधांचे व्हिडीओ आपण पाहिल्याचे ती सांगितले. जेव्हा मी हे व्हिडीओ बघितले तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्याला मुलांमध्ये इंटरेस्ट असून तो समलैंगिक असल्याचे व्हिडीओ आपल्याकडे आहेत. हे व्हिडीओ मी कोर्टासमोर सादर करणार आहे, असेही स्वीटी म्हणते.

हे प्रकरण शांततेत मिटावे अशी माझी इच्छा होती, पण तो माणूस माघारच घेत नाहीय. हा प्रकार माझ्या आई-वडिलांनाही सांगायची माझी हिम्मत झाली नाही, पण आता सोशल मीडियावर उघड करण्यासाठी दुसरा पर्याय माझ्याकडे नाही, असे ती म्हणाली.

मला फक्त घटस्फोट हवा होता. मी त्याच्याकडे एक रुपयांचीही मागणी केली नव्हती. 2015 मध्ये आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्याची घरी शौचालयही नव्हते. मी त्यावेळी अनेक पदकं जिंकली होती. पण त्याने यशाची तेवढी चव चाखली नव्हती, असेही ती म्हणाली. तसेच मला त्याच्या संपत्तीमध्ये इंटरेस्ट असता तर मी त्याच्यासोबत रहायला तयार झाले असते का? असा सवालही तिने केला.

दरम्यान, स्वीटी बूरा आणि दीपक हुड्डा यांचा 2022 मध्ये विवाह झाला होता. त्यानंतर स्वीटीने पतीविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला होता. लग्नामध्ये 1 कोटी आणि फॉर्च्युनर देऊनही आपला छळ करण्यात आल्याचा आरोप स्वीटीने केला होता, तर दीपकनेही आपल्यावर चाकू हल्ला झाल्याचा आरोप केला होता. दोघांनीही एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. विशेष म्हणजे दोघेही भाजपचे नेते असून दीपकने हरयाणा विधानसभा निवडणूकही लढली होती. मात्र त्याला पराभव स्वीकारावा लागला होता.

पती नाही कसाई; श्वास कोंडेपर्यंत मारहाण; 1 कोटी अन् फॉर्च्यूनरचीही मागणी, वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सरचा पतीवर गंभीर आरोप