
एकेकाळची बॉक्सरची वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या सविती बुरा हिने पोलीस ठाण्यात पती दीपक निवास हुडा याला मारहाण केल्याची घटना कॅमेऱ्यात पैद झाली. 15 मार्च रोजी ही घटना घडली असून काल हा व्हिडीओ व्हायरल झाला. दीपक हुडा हा कबडीपट्टू आहे. दीपकने हुंडय़ासाठी मारहाण केल्याचा आरोप करत सविती बुरा हिने घटस्फोटासाठी अर्ज केलेला आहे. त्यासंदर्भात पोलीस ठाण्यात बोलणी सुरू असतानाच सविती बुरा हिने दीपकवर हल्ला केला.
हरयाणाच्या हिसार पोलीस ठाण्यात ही घटना घडली. यामध्ये असं दिसतंय की, सविती बुरा धावत दीपक हुडाच्या दिशेने येते. त्याचा गळा पकडून त्याच्यावर हल्ला करते. पोलीस ठाण्यात दोघांमध्ये वाद झाल्याने कुटुंबातील सदस्यांनी हस्तक्षेप करून दोघांना बाजूला केले. बुरा आणि हुडा यांचा विवाह 2022 साली झाला. दोन्ही खेळाडूंना प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे.