नवीन वर्ष सुरू होऊन सहा महिन्यांचा काळ लोटला आहे. या सहा महिन्यात अनेक बड्या कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित झाले. यात अजय देवगन, अक्षय कुमार, ऋतिक रोशन सारख्या कलाकारांचाही समावेश आहे. यातील काहींनी यशाची चव चाखली, तर काहींच्या चित्रपटापुढे फ्लॉपचा शिक्का बसला.
गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही तिकीटबारीवर बॉलीवूड चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचतील असा अंदाज होता. मात्र अनेक चित्रपटांचे शो गर्दीअभावी बंद करावे लागले. काही चित्रपट तर आपल्या बजेटएवढीही कमाई करू शकले नाहीत. यात मेरी क्रिसमस, क्रॅक, बड़े मियां छोटे मियां, मैदान यासारख्या चित्रपटांचाही समावेश आहे.
आयएमडीच्या अहवालानुसार सिद्धार्थ आनंद यांच्या फायटर या चित्रपटाचे बजेट 225 कोटी रुपये असून हा चित्रपट तिकीटबारीवर 212 कोटींचीच कमाई करू शकला. याआधी कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांचा मेरी क्रिसमस हा चित्रपटही फ्लॉप गेला होता.
“बसप्रवासात मागून एक हात आला अन्…”, सई ताम्हणकरने सांगितला अंगावर काटा येणारा प्रसंग
- मेसी क्रिसमस चित्रपटाचे बजेट 50 कोटी होते. या चित्रपटाने फक्त 17.9 कोटींचा गल्ला जमवला.
- फायटर चित्रपटाचे बजेट 225 कोटी होते. हा चित्रपट 212 कोटीच कमावू शकला.
- क्रॅक चित्रपटाचे बजेट 40 कोटी, तर कलेक्शन 19.9 कोटी होते.
- योद्धा या चित्रपटाचे बजेट 55 कोटी आणि ब़ॉक्स ऑफिस कलेक्शन 35.1 कोटी राहिले.
- बस्तर-द नक्सल स्टोरी हा चित्रपट बनवायला 15 कोटी लागले. मात्र हा चित्रपट फक्त 1.30 कोटीच कमाई करू शकला.
- बड़े मियां छोटे मियां या चित्रपटाचे बजेट 250 कोटी असून हा चित्रपट फक्त 76 कोटींचा गल्ला जमवू शकला.
- मैदान या चित्रपटाचे बजेट 125 कोटी रुपये होते, पण हा चित्रपटही फक्त 62.5 कोटी कमावू शकला.