बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्याला अटक

डी कंपनीच्या नावाखाली शहरात बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या एकाला बोरिवली पोलिसांनी अटक केली. सूरज जाधव असे त्याचे नाव आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात आज एक फोन आला. फोन करणाऱ्याने शहरात ठीकठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचे सांगून फोन कट केला. तो फोन बोरिवलीतून आल्याचे समोर आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी तपासाच्या सूचना दिल्या. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी जाधवला ताब्यात घेतले.